बहुतांचे धांवणें केलें – संत चोखामेळा अभंग – २१४

बहुतांचे धांवणें केलें – संत चोखामेळा अभंग – २१४

बहुतांचे धांवणें केलें बहुतापरी ।
उदार श्रीहरी वैकुंठीचा ॥१॥
तोचि महाराज चंद्रभागें तीरीं ।
उभा विटेवरी विठ्‌ठल देवो ॥२॥
भक्तीचा आळुका भावाचा भुकेला ।
न कळे ज्याची लीला ब्रह्मादिका ॥३॥
चोखा म्हणे तो हा नांदतो पंढरी ।
दरुशनें उद्धरीं जडजीवां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

बहुतांचे धांवणें केलें – संत चोखामेळा अभंग – २१४