मुळींचा संचला आला – संत चोखामेळा अभंग – २१३

मुळींचा संचला आला – संत चोखामेळा अभंग – २१३

मुळींचा संचला आला गेला कुठें ।
पुंडलिक पेठे विटेवरी ॥१॥
विठोबा देखणा विठोबा देखणा ।
योगियांचा राणा पंढरीये ॥२॥
भाविका कारणें उभारोनि हात ।
वाट जो पहात अनुदिनीं ॥३॥
चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कृपाळ ।
दीनांचा दयाळ पंढरीये ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मुळींचा संचला आला – संत चोखामेळा अभंग – २१३