संत चोखामेळा अभंग

अवघी पंढरी भुवैकुंठ – संत चोखामेळा अभंग – २०९

अवघी पंढरी भुवैकुंठ – संत चोखामेळा अभंग – २०९


अवघी पंढरी भुवैकुंठ नगरी ।
नांदतसे हरी सर्वकाळ ॥१॥
चतुर्भुज मूर्ति शंख चक्र करीं ।
पीतांबरधारी श्यामवर्ण ॥२॥
श्रीमुख शोमर्ले किरीट कुंडलें ।
तेचि मिरवले चंद्र सूर्य ॥३॥
पीतांबर कासे सोनसळा विराजे ।
सर्वांगीं साजे चंदनउटी ॥४॥
मिरवले कर दोनी कटावरी ।
ध्यान तें त्रिपुरारि ध्यात असे ॥५॥
सनकादिक भक्त पुंडलिक मुनि ।
सुखसमाधानी सर्वकाळ ॥६॥
आनंदाचा कंद उभा विटेवरी ।
चोखा परोपरी नाचतसे ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अवघी पंढरी भुवैकुंठ – संत चोखामेळा अभंग – २०९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *