संत चोखामेळा अभंग

आपुलिया सुखा आपणचि – संत चोखामेळा अभंग – २०४

आपुलिया सुखा आपणचि – संत चोखामेळा अभंग – २०४


आपुलिया सुखा आपणचि आला ।
उगलाचि ठेला विटेवरी ॥१॥
तें हें सगुण रुप चतुर्भुज मूर्ति ।
शंख चक्र हातीं गदा पहा ॥२॥
किरीट कुंडलें वैजयंती माळा ।
कासे सोनसळा तेज फांके ॥३॥
चोखा म्हणे सर्व सुखाचें आगर ।
रुप मनोहर गोजिरें तें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आपुलिया सुखा आपणचि – संत चोखामेळा अभंग – २०४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *