संत चोखामेळा अभंग

सुंदर मुखकमल कस्तुरी – संत चोखामेळा अभंग – २००

सुंदर मुखकमल कस्तुरी – संत चोखामेळा अभंग – २००

सुंदर मुखकमल कस्तुरी मळवटीं ।
उभा देखिला तटीं भीवरेच्या ॥१॥
मकराकार कुंडलें श्रवणीं ढाळ देती ।
गळां वैजयंती मुक्तमाळा ॥२॥
शंख चक्र गदा पद्म चहूं करीं ।
गरुडवाहन हरी देखियेला ॥३॥
चोखा म्हणे सर्वं सुखाचें आगर ।
निरा भिवरा तिर विठ्‌ठल उभा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सुंदर मुखकमल कस्तुरी – संत चोखामेळा अभंग – २००

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *