ज्या कारणें वेदश्रुति अनुवादती । तो हा रमापती पंढरीये ॥१॥ सुखाचें ठेवणें क्षीरसागर निवासी । तो हा पंढरीसी उभा विटे ॥२॥ भाविका कारणें उभवोनि हात । उदारपणें देत भुक्तिमुक्ती ॥३॥ न पाहे उंच नीच याती कुळ । स्त्री शूद्र चांडाळा सरते पायीं ॥४॥ चोखा म्हणे ऐसा भावाचा भुकेला । म्हणोनि स्थिरावला भीमातटीं ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.