Skip to content
सुखाचें जें सुख – संत चोखामेळा अभंग – १९८
सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं ।
पुंडलीकापाठीं उभें असे ॥१॥
साजिरें गोजिरें समचरणीं उभें ।
भक्ताचिया लोभें विटेवरी ॥२॥
कर दोनीं कटीं श्रीमुख चांगले ।
शंख चक्र मिरवले गदापहा ॥३॥
चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी ।
चंदनाची उटी सर्व अंगी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
सुखाचें जें सुख – संत चोखामेळा अभंग – १९८