Skip to content
सर्वही सुखाचें ओतिलें – संत चोखामेळा अभंग – १९६
सर्वही सुखाचें ओतिलें श्रीमुख ।
त्रिभुवन नायक पंढरीये ॥१॥
कर दोन्ही कटीं सम पाय विटे ।
शोभले गोमटें बाळरुप ॥२॥
जीवाचें जीवन योगियांचें धन ।
चोखा म्हणे मंडन तिन्ही लोकीं ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
सर्वही सुखाचें ओतिलें – संत चोखामेळा अभंग – १९६