अनाम जयासी तेंचि – संत चोखामेळा अभंग – १९५

अनाम जयासी तेंचि – संत चोखामेळा अभंग – १९५


अनाम जयासी तेंचि रुप आलें ।
उभें तें राहीलें विटेवरी ॥१॥
पुंडलिकाच्या प्रेमा युगें अठ्‌ठावीस ।
समचरणीं वास पंढरीये ॥२॥
चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कनवाळू ।
जाणें लळा पाळू भाविकांचा ॥३॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अनाम जयासी तेंचि – संत चोखामेळा अभंग – १९५