व्यापक व्यापला तिहीं त्रिभुवनीं । चारी वर्ण खाणी विठू माझा ॥१॥ शंख चक्र करीं वैजयंती माळा । नेसला पिवळा पितांबर ॥२॥ कटावरी जेणें कर हे ठेविले । ध्यान मिरविलें भीमातिरीं ॥३॥ चोखा म्हणे माझा आनंदाचा कंद । नाम हे गोविंद मिरविलें ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.