अनादि निर्मळ वेदाचें – संत चोखामेळा अभंग – १९२
अनादि निर्मळ वेदाचें – संत चोखामेळा अभंग – १९२
अनादि निर्मळ वेदाचें जें मूळ ।
परब्रह्म सोज्वळ विटेवरी ॥१॥
कर दोन्ही कटीं राहिलासे उभा ।
नीळवर्ण प्रभा फांकतसे ॥२॥
आनंदाचा कंद पाउलें साजिरीं ।
चोखा म्हणे हरी पंढरीये ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
अनादि निर्मळ वेदाचें – संत चोखामेळा अभंग – १९२