वासुदेव दिंडी गान । प्रसाद मागूं आले दान । आणिक आले कोण कोण । त्यांची नावें परिसावी ॥१॥ ब्राम्हाण क्षत्रिय शूद्र वाणि । मागूं आल्या चारी खाणी । लिहिणार जोशी पंडित गणीं । चाटे भाट आले ते ॥२॥ गोंधळ डफ गाणें बहीरव जोगी । बाळसंतोषी आणि बैरागी । फकीर डाकुलता तो वेगी । कान फाडया आला तो ॥३॥ सारमंडळी आलासे । राहा विनोदें बोलतसे । चोखा महार जोहार करितसे । प्रसाद देई म्हणोनी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.