बहुत प्रकार बहुत या जगाचे । काय वानूं त्याचे गुणदोष ॥१॥ नीच हे याति अनामिक नांव । तेथें भावाभाव कोण कैचा ॥२॥ चाहाड चोर जार भ्रष्ट ते साचे । हीनत्व जन्मांचे पदरीं आहे ॥३॥ चोखा म्हणे त्यांचे संगती पडिलों । बहु हे पीडिलों वियोगानें ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.