पंचही भूतांचा एकचि – संत चोखामेळा अभंग – १८३
पंचही भूतांचा एकचि – संत चोखामेळा अभंग – १८३
पंचही भूतांचा एकचि विटाळ ।
अवघाचि मेळ जगीं नांदे ॥१॥
तेथें तो सोंवळा वोंवळा तो कोण ।
विटाळाचें कारण देह मूळ ॥२॥
आदिअंती अवघा विटाळ संचला ।
सोंवळा तो झाला कोण न कळे ॥३॥
चोखा म्हणे मज नवल वाटतें ।
विटाळा परतें आहे कोण ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
पंचही भूतांचा एकचि – संत चोखामेळा अभंग – १८३