पंचही भूतांचा एकचि विटाळ । अवघाचि मेळ जगीं नांदे ॥१॥ तेथें तो सोंवळा वोंवळा तो कोण । विटाळाचें कारण देह मूळ ॥२॥ आदिअंती अवघा विटाळ संचला । सोंवळा तो झाला कोण न कळे ॥३॥ चोखा म्हणे मज नवल वाटतें । विटाळा परतें आहे कोण ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.