कोण तो सोंवळा कोण तो वोंवळा । दोहींच्या वेगळा विठ्ठल माझा ॥१॥ कोणासी विटाळ कशाचा जाहला । मुळींचा संचला सोंवळाची ॥२॥ पांचाचा विटाळ येकचिये आंगा । सोंवळा तो जगामाजी कोण ॥३॥ चोखा म्हणे माझा विठ्ठल सोंवळा । अरूपें आगळा विटेवरी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.