वाढलें शरीर काळाचें हें ग्वाजें । काय माझें तुझें म्हणतोसी ॥१॥ बाळ – तरुण दशा आपुलेच अंगीं । आपणची भोगी वृद्धपण ॥२॥ आपुला आपण न करी विचार । काय हे अमर शरीर याचें ॥३॥ चोखा म्हणे भुलला मोहळाचे परी । मक्षिके निर्धारी वेढियेला ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.