लिहिलें संचितीं न चुके – संत चोखामेळा अभंग – १७२
लिहिलें संचितीं न चुके – संत चोखामेळा अभंग – १७२
लिहिलें संचितीं न चुके कल्पांतीं ।
वायां कुंथाकुंथीं करूनी काय ॥१॥
जन्ममरण सुखदु:खाचें गांठोडें ।
हें तों मागें पुढें बांधलेंसे ॥२॥
निढळींची अक्षरे साच तेचि खरे ।
आतां वोरबार करील कोण ॥३॥
चोखा म्हणे आमुची जैशी कां वासना ।
तैशीच भावना होत जात ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
लिहिलें संचितीं न चुके – संत चोखामेळा अभंग – १७२