याचिया छंदा जे लागले प्राणी । त्याची धुळधाणी केली येणें ॥१॥ याचा संग पुरे याचा संग पुरे । अंतरी ते उरे हांव हांव ॥२॥ स्वार्थ परमार्थ घातिलासे चिरा । किती फजीतखोरा बुझवावें ॥३॥ न जावें तेथें हाटेची जाय । करूं नये तें करीं स्वयें न धरीं कांही ॥४॥ चोखा म्हणे तुज तुझीच आण । होई समाधान घटिकाभरी ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.