नेणपणें मिठी घालीन पदरा । बैसेन द्वारांत तयाचिया ॥१॥ आशा हे पाठी घेवोनी सांगतों । निचेष्ट निरूतें भरीन माजी ॥२॥ लाभाचा हा लाभ येईल माझे हाती । मग काय चिंता करणें काज ॥३॥ चोखा म्हणे मज हेचि वाटे गोड । आणिक नाहीं चाड दुजी कांही ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.