दु:खरूप देह दु:खाचा – संत चोखामेळा अभंग – १६१
दु:खरूप देह दु:खाचा – संत चोखामेळा अभंग – १६१
दु:खरूप देह दु:खाचा संसार ।
सुखाचा विचार नाहीं कोठें ॥१॥
कन्या पुत्र बाळें सुखाचे सांगाती ।
दु:ख होतां जाती आपोआप ॥२॥
सोयरे धायरे कवणाचे कवण ।
अवघा वाटे शीण मना माझ्या ॥३॥
चोखा म्हणे अहो पंढरीनिवासा ।
सोडवी भवपाशा पासोनिया ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
दु:खरूप देह दु:खाचा – संत चोखामेळा अभंग – १६१