देह बुद्धीवेगळें जें आकारलें । निर्गुण तें सगुणपणें उभें केलें ॥१॥ देव पहा तुम्हीं देव पहा । तुम्हीं देव पहा तुम्हीं आपुले देहीं ॥२॥ उघडाचि देवो जगीं प्रकाशला । नागव्याक्तानें देव ग्रासीला ॥३॥ चोखा म्हणे नागवे उघडे झाले एक । सहज मीपण देख मावळले ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.