Skip to content
देव म्हणे नारदासी – संत चोखामेळा अभंग – १५८
देव म्हणे नारदासी ।
जाय निर्मळा तीर्थासी ॥१॥
तीर्थ निर्मळे संगमी ।
स्नान करी नारदस्वामी ॥२॥
नारदाची नारदी सरी ।
धन्य धन्य मेहुणपुरी ॥३॥
चोखा म्हणे हेंचि देई ।
स्नान घडो तये ठायीं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
देव म्हणे नारदासी – संत चोखामेळा अभंग – १५८