Skip to content
तुम्ही तों सांकडें – संत चोखामेळा अभंग – १५७
तुम्ही तों सांकडें बहुत वारिलें ।
आतां कां उगलें बोलूं देवा ॥१॥
आजीवरी पडिलों लिगाडाचे गुंतीं ।
तेणेंचि फजिती झाली दिसे ॥२॥
झाला दिसे मज मोकळा मारग ।
धिक्कारिती जग मागें पुढें ॥३॥
चोखा म्हणे ऐसें विपरीत देखिलें ।
तें साचचि संचलें मनीं माझ्या ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
तुम्ही तों सांकडें – संत चोखामेळा अभंग – १५७