तुटला आयुष्याचा दोरा – संत चोखामेळा अभंग – १५६

तुटला आयुष्याचा दोरा – संत चोखामेळा अभंग – १५६

तुटला आयुष्याचा दोरा ।
येर वाउगा पसारा ॥१॥
ताकोनी पळती रांडा पोरें ।
अंती होती पाठमोरे ॥२॥
अवघे सुखाचे सांगती ।
कोणी कामा नये अंती ॥३॥
चोखा म्हणे फजितखोर ।
माझें माझें म्हणे घर ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तुटला आयुष्याचा दोरा – संत चोखामेळा अभंग – १५६