डोळियाचा देंखणा पाहतांच – संत चोखामेळा अभंग – १५५
डोळियाचा देंखणा पाहतांच – संत चोखामेळा अभंग – १५५
डोळियाचा देंखणा पाहतांच दिठी ।
डोळाच निघाला देखण्या पोटी ॥१॥
डोळ्याचा देखणा पाहिला डोळा ।
आपेआप तेथें झांकला डोळा ॥२॥
चोखा म्हणे नवलाव झाला ।
देखणा पाहतां डोळा विराला ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
डोळियाचा देंखणा पाहतांच – संत चोखामेळा अभंग – १५५