जया जे वासना तया – संत चोखामेळा अभंग – १५४
जया जे वासना तया – संत चोखामेळा अभंग – १५४
जया जे वासना तया ती भावना ।
होतसे जाणा आदि अंतीं ॥१॥
कामाचे विलग आवरावें चित्त ।
क्रोधाचा तो ऊत शांतवोनी ॥२॥
ममताही माया दंभ अहंकार ।
आवरावे साचार शांति सुखें ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरावा संग ।
तरीच पांडुरंग हाता लागे ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
जया जे वासना तया – संत चोखामेळा अभंग – १५४