जया जे वासना तया ती भावना । होतसे जाणा आदि अंतीं ॥१॥ कामाचे विलग आवरावें चित्त । क्रोधाचा तो ऊत शांतवोनी ॥२॥ ममताही माया दंभ अहंकार । आवरावे साचार शांति सुखें ॥३॥ चोखा म्हणे याचा न धरावा संग । तरीच पांडुरंग हाता लागे ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.