जन्मांचे साकडें नाहीं माझे कोडें । जेंणें तुम्हां पडे वोझें देवा ॥१॥ कोणत्याही कुळीं उंच नीच वर्ण । हे मज कारण नाहीं त्याचें ॥२॥ कोण हे आघवे सुखाचे संगती । अंतकाळी होती पाठीमोरे ॥३॥ चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा । शरण जा सर्वेशा विठोबासी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.