जन्मला देह पोशिला – संत चोखामेळा अभंग – १५१
जन्मला देह पोशिला – संत चोखामेळा अभंग – १५१
जन्मला देह पोशिला सुखाचा ।
काय भरंवसा याचा आहे ॥१॥
येकलेंचि यावें येकलेंचि जावें ।
हेंचि अनुभवावें आपणाची ॥२॥
कोण हे आघवे सुखाचे संगती ।
अंतकाळी होती पाठीमोरे ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा ।
शरणजा सर्वेशा विठोबासी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
जन्मला देह पोशिला – संत चोखामेळा अभंग – १५१