जन्मला देह पोशिला सुखाचा । काय भरंवसा याचा आहे ॥१॥ येकलेंचि यावें येकलेंचि जावें । हेंचि अनुभवावें आपणाची ॥२॥ कोण हे आघवे सुखाचे संगती । अंतकाळी होती पाठीमोरे ॥३॥ चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा । शरणजा सर्वेशा विठोबासी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.