निगमाचे शाखे आगमाचें – संत चोखामेळा अभंग – १५
निगमाचे शाखे आगमाचें – संत चोखामेळा अभंग – १५
निगमाचे शाखे आगमाचें फळ ।
वेद शास्त्रा बोल विठ्ठल हा ॥१॥
पुराणासी वाड योगियांचें गुज ।
सकळां निजबीज विठ्ठल हा ॥२॥
निगम कल्पतरू भक्तांचा मांदुस ।
तोही स्वयंप्रकाश विठ्ठल हा ॥३॥
चोखा म्हणे तो तूं जगाचें जीवन ।
संतांचें मनरंजन विठ्ठल हा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
निगमाचे शाखे आगमाचें – संत चोखामेळा अभंग – १५