निगमाचे शाखे आगमाचें फळ । वेद शास्त्रा बोल विठ्ठल हा ॥१॥ पुराणासी वाड योगियांचें गुज । सकळां निजबीज विठ्ठल हा ॥२॥ निगम कल्पतरू भक्तांचा मांदुस । तोही स्वयंप्रकाश विठ्ठल हा ॥३॥ चोखा म्हणे तो तूं जगाचें जीवन । संतांचें मनरंजन विठ्ठल हा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.