आपुला विचार न कळे जयांसी । ते या संसाराशी पशू आले ॥१॥ पशूचा उपयोग बहुतांपरी आहे । हा तो वायां जाय नरदेह ॥२॥ परि भ्रांति भुली पडलीसे जीवा । आवडी केशवा नाठविती ॥३॥ चोखा म्हणे नाम जपतां फुकाचें । काय याचें वेचे धन वित्त ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.