असोनि नसणें संसाराचे – संत चोखामेळा अभंग – १४२

असोनि नसणें संसाराचे – संत चोखामेळा अभंग – १४२

असोनि नसणें संसाराचे ठाईं ।
हाचि बोध पाहीं मना घ्यावा ॥१॥
संतांची संगती नामाची आवडी ।
रिकामी अर्ध घडी जावों नेदी ॥२॥
काम क्रोध सुनेपरी करी दूरी ।
सहपरिवारी दवडी बापा ॥३॥
चोखा म्हणे सुख आपेआप घरा ।
नाहीं तर फजीतखोरा जासी वायां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

असोनि नसणें संसाराचे – संत चोखामेळा अभंग – १४२