अखंड समाधी होउनी ठेलं मन । गेलें देहभान विसरोनी ॥१॥ विधिनिषेध भेणें न मोडे समाधी । तुटली उपाधी लिगाडाची ॥२॥ चालतां बोलतां न मोडे समाधी । मूळ अंतरशुद्धी कारण हें ॥३॥ चोखा म्हणे ऐसा समाधी सोहळा । जाणे तो विरळा लक्षामाजीं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.