माझ्या मना तूं धरी कां विचार । न करी प्रकार आन कांहीं ॥१॥ पंढरीसी कोणी जाती वारकरी । सुखें त्यांचे घरी पशुयाती ॥२॥ तयाचिया सवें घडेल चिंतन । चंद्रभागे स्नान एकादशी ॥३॥ जागर क्षिरापती वैष्णव सांगाते । घडेल आपैतें लाभ मज ॥४॥ चोखा म्हणे घडेल संतांची संगती । सहज पंगती बैसेन मी ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.