हातींच्या कांकणा कासया – संत चोखामेळा अभंग – १३३

हातींच्या कांकणा कासया – संत चोखामेळा अभंग – १३३

हातींच्या कांकणा कासया आरसा ।
धरावा भरवंसा विठ्ठलनामीं ॥१॥
नलगे साचार याग यज्ञ विचार ।
जप निरंतर विठ्ठलनामी ॥२॥
योग्यांचिया वाटे नलगे खटपट ।
नामचि फुकट जपा आधीं ॥३॥
चोखा म्हणे सुख संताचे संगती ।
नाम अहोरात्रीं जप करा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

हातींच्या कांकणा कासया – संत चोखामेळा अभंग – १३३