सूखा कारणें करी तळमळ । जपें सर्वकाळ विठ्ठल वाचे ॥१॥ तेणें सर्व सुख होईल अंतरा । चुकती वेरझारा जन्ममरण ॥२॥ न लगे वेचावें धनाचिये पेटी । धरा नाम कंठीं विठोंबाचे ॥३॥ बैसोनी निवांत करावें चिंतन । राम कृष्ण नारायण दिननिशीं ॥४॥ चोखा म्हणे ऐसा करावा निर्धार । नाम एक सार विठोबाचें ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.