माझ्या तो मनें केलासे विचार । आणिक प्रकार नेणें कांही ॥१॥ नाम वेळोवेळां आठवावे वाचे । दुजें आणिकांचें भय नाहीं ॥२॥ आवडी बैसली विठूचे चरणीं । आतां दुजेपणीं नाहीं गोष्टी ॥३॥ चोखा म्हणे दृढ केलोसे संती । म्हणोनी विश्रांती जीवा झाली ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.