नाशिवंतासाठीं करितोसी आटी । दृढ धरा कंठीं एक नाम ॥१॥ भवासी तारक विठ्ठलची एक । नाहीं आणिक सुख येतां जातां ॥२॥ एक एक योनी कोटी कोटी फेरा । नरदेहीं थारा तईच लाभे ॥३॥ चोखा म्हणे येथें एकचि साधन । संतासी शरण जाईं सुखें ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.