त्रैलोक्य वैभव ओवाळोनि – संत चोखामेळा अभंग – १२०

त्रैलोक्य वैभव ओवाळोनि – संत चोखामेळा अभंग – १२०

त्रैलोक्य वैभव ओवाळोनि सांडावें ।
नाम सुखें घ्यावें विठोबाचें ॥१॥
आणिक साधनें आहेत बहुतांपरी ।
नामाची ती सरी न पवती ॥२॥
म्हणोनि सुलभ विठ्ठल एक नाम ।
गातां नाचतां प्रेमें मुक्ति तया ॥३॥
चोखा म्हणे माझा अनुभव उघडा ।
भवभय पीडा येणें वारे ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

त्रैलोक्य वैभव ओवाळोनि – संत चोखामेळा अभंग – १२०