त्रैलोक्य वैभव ओवाळोनि सांडावें । नाम सुखें घ्यावें विठोबाचें ॥१॥ आणिक साधनें आहेत बहुतांपरी । नामाची ती सरी न पवती ॥२॥ म्हणोनि सुलभ विठ्ठल एक नाम । गातां नाचतां प्रेमें मुक्ति तया ॥३॥ चोखा म्हणे माझा अनुभव उघडा । भवभय पीडा येणें वारे ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.