आम्हां अधिकार उच्छिष्ट – संत चोखामेळा अभंग – ११५
आम्हां अधिकार उच्छिष्ट – संत चोखामेळा अभंग – ११५
आम्हां अधिकार उच्छिष्ट सेवन ।
संतांचे पूजन हेंचि बरें ॥१॥
सुलभ सोपारें विठोबाचें नाम ।
आणिक नाहीं वर्म दुजें काहीं ॥२॥
आवडीनें नाम गाईन उल्हासें ।
संतांच्या सहवासें खेळीं मेळीं ॥३॥
चोखा म्हणे माझी आवडी ही देवा ।
पुरवावी केशवा जन्मोजन्मी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
आम्हां अधिकार उच्छिष्ट – संत चोखामेळा अभंग – ११५