अवघ्या साधनांचे – संत चोखामेळा अभंग – १११अवघ्या साधनांचे सार ।
रामकृष्ण हा उच्चार ॥१॥ येणें घडे सकळ नेम । वाचें नाम जपतांचि ॥२॥ भाग्यें होय संत भेटी । सांगू गोष्ट सुखाच्या ॥३॥ चोखा म्हणे मज आनंद झाला । जीवलग भेटला मायबाप ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.