अवघा आनंद राम परमानंद । हाचि लागो छंद माझे जीवा ॥१॥ हेंचि साधन निकें जगासी उद्धार । आणिक साचार दुजें नाहीं ॥२॥ क्रोधांचे न पडतां आघात । वाचे गातां गीत राम नाम ॥३॥ चोखा म्हणे ऐसा भरंवसा नामाचा । जेथें कळिकाळांचा रीघ नाहीं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.