हीन याती माझी देवा । कैसी घडे तुझी सेवा ॥१॥ मज दूर दूर हो म्हणती । तुज भेटूं कवण्या रीती ॥२॥ माझा लागतांचि कर । सिंतोडा घेताती करार ॥३॥ माझ्या गोविंदा गोपाळा । करूणा भाकी चोखामेळा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.