सुखाचिया लागीं करितों – संत चोखामेळा अभंग – १०६
सुखाचिया लागीं करितों – संत चोखामेळा अभंग – १०६
सुखाचिया लागीं करितों ।
तो अवघेंचि वाव येतें ॥१॥
करितां तळमळ मन हें राहिना ।
अनावर जाणा वासना हे ॥२॥
अवघेचि सांकडें दिसोनियां आलें ।
न बोलावें तें भलें कोणा पुढें ॥३॥
चोखा म्हणे मी पडिलों गुर्हाडीं ।
सोडवी तातडी यांतूनीयां ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
सुखाचिया लागीं करितों – संत चोखामेळा अभंग – १०६