यातीहीन मज म्हणती – संत चोखामेळा अभंग – १०१
यातीहीन मज म्हणती – संत चोखामेळा अभंग – १०१
यातीहीन मज म्हणती देवा ।
न कळे करूं तुमची सेवा ॥१॥
आम्हां नीचांचे तें काम ।
वाचें गावें सदां नाम ॥२॥
उच्छिष्टाची आस ।
संत दासाचा मी दास ॥३॥
चोखा म्हणे नारायण ।
पदरीं घेतलें मज दीना ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
यातीहीन मज म्हणती – संत चोखामेळा अभंग – १०१