सांडोनि तितुकें यथाबीज – संत भानुदास अभंग काला – ९२
सांडोनि तितुकें यथाबीज केलें ।
कैंसे चाळविलें कानडीयाने ॥१॥
रखुमाई आई ती जालीसे उदास ।
पुंडलिका कैसें पडिलें मौन ॥२॥
कनकाचें ताटीं रत्नाचे दीपक ।
सुंदर श्रीमुख वोवाळती ॥३॥
भानुदास म्हणे चला मजसवें ।
वाचा ऋणदेवें सांभाळावें ॥४॥